Posts

१२. जगाला बदलू नका

     खूप वर्षांपूर्वीची एक गोष्ट आहे.  एक राजा आपल्या राज्यावर यशस्वीपणे राज्य करत होता. एकदा तो आपल्याच राज्यातील काही अज्ञात ठिकाणी भेट देण्यासाठी गेला. जेव्हा तो राजा हा दौरा पूर्ण करून आपल्या राजवाड्यात परत आला. त्याने तक्रार करायला सुरवात केली. प्रवासामुळे त्याचे पाय खूप दुखत होते. कारण यावेळी पहिल्यांदा त्याने एवढा दूरचा प्रवास केला होता आणि प्रवासातला रस्ता ही तसाच खडतर आणि खडकाळ होता.       त्या प्रवासानंतर त्याने आपल्या राज्यातले कर्मचाऱ्यांना सगळे रस्ते कातडीने झाकायला सांगितले. अर्थात या गोष्टीसाठी त्याना खूप जास्त गायीच्या कातड्याचे आणि पैशाची गरज होती.        त्याच्याच राजवाड्यातील एका नोकराने शेवटी धाडस करून  त्याला सांगितले " एवढे विनाकारण कशाला पैसे खर्च करायचे, तुम्ही त्याच कातडीचा तुकडा काढून त्याने तुमचे पाय का नाही झाकत ?"       सुरवातीला राजाला आश्चर्य वाटले पण नंतर त्याने मोठ्या मनाने मान्य केले आणि स्वतः साठी बूट बनवले.   ...

११. पर्वत म्हणतो अभिमानाने

पर्वत म्हणतो अभिमानाने तू पण उंच होऊन बघ सागर म्हणतो या लाटासम  खोल मनाचा तळ होऊन बघ समजून घे काय सांगतात वाहणाऱ्या या लहरींना भरून घे तू मनात आपल्या गोड मृदू आकांशाना पृथ्वी म्हणते धीर असू दे किती वाढला डोक्यावर भार आकाश म्हणते पसरावे तू  सामावून घे सारा संसार (कवी, सोहन लाल द्विवेदी लिखित पर्वत केहता शिश उठाकर या कवितेचा अनुवाद )

शिंपले

Image
काही दिवसांपूर्वी एक हिंदी कथा वाचण्यात आली. कथा अशी होती, एक सहा वर्षाचा मुलगा आपल्या चार वर्षाच्या बहिणीला घेऊन बाजारातून चालला होता. त्याला अचानक वाटले आपली बहीण मागे राहिली म्हणून त्याने मागे वळून पाहिले. त्याला दिसले,  ती एका दुकानाच्या बाहेर उभी राहून काचेच्या पलीकडे ठेवलेली खेळणी निरखून बघत होती. तो मुलगा धावत मागे आला आणि तिला विचारले " तूला काही हवे का यातले ? " तिच्या निरागस डोळ्यांनी एका ठिकाणी नजर रोखली आणि सुंदर बाहुलीकडे बोट दाखवले. आपल्या बहिणीचा हात पकडून तो तिला दुकानात घेऊन आला. त्याने ती बाहुली उचलून तिच्या हातात दिली. ती बाहुली हातात आल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तो मनोमन खुश झाला. दुकानदार गल्ल्यावर बसून हे सारे पाहत होता. तो मुलगा तिला घेऊन दुकानदाराजवळ आला. सहा वर्षाच्या त्या मुलाचे आपल्या बहिणीसाठी भरून आलेले काळीज बघून दुकानदाराला गहिवरून आले. मुलाने दुकानदाराला विचारले " या बाहुलीची किंमत काय आहे ? " त्यावर तो म्हणला " बाळा, तू सांग ... तू काय देऊ शकशील ? " तेव्हा त्या मुलाने खिशात हात घातला आणि खिशातून शिंपल...

९. नाटक ( विनोदी )

घडी घडीच्या कथा आज सानियाचा  पारा काही वेगळाच चढला होता. चार दिवसाच्या टूर वरून आल्यावर दिवसभर सोहमचे सानिया सोबत काहीच बोलणे झाले नव्हते आणि तितकेच निमित्त होते. त्यामुळे कायम बडबडणारी व्यक्ती काहीच बोलत नव्हती. ही भयाण शांतता कशी मोडायची या विचारात सोहम किचन मध्ये गेला. त्यावर उपाय म्हणून सोहमने चहा केला आणि कवितेचा घाट घातला. सोहम काव्य रसिक, त्यामुळे ते त्याच्या हातातील दुधारी शस्त्र म्हणून तो बऱ्याच वेळी हमखास ते वापरायचा. हातात दोन चहाचे कप घेऊन तो बाहेर आला. तिच्या समोरच्या टेबलावर ते ठेवले. फोन मध्ये काही तरी पाहिल्यासारखे केले आणि बोलू लागला. सोहम : रुसलीस तू, चूक माझी कळेना हरवलेल्या चेहऱ्यावरचे हसू पुन्हा मिळेना काही वेळ दूर गेलो काय आता मात्र जुळेना नाकावरच्या रागाचे औषध काही मिळेना ( सोहम उठून उभा राहिला. सानियाच्या जवळ गेला. तिच्या हातात पुस्तक होते. ते पाठून जाऊन ते घेतलं ) सोहम :  रुसणार तू समजवणार मी वाद काही मिटेना  रुसवा तुझा घालवू कसा कोडे काही सुटेना ( सानिया पुन्हा उठून लांब गेली. तो ही तिच्या मागे...) सोहम : ऋतू बदलले तरीही खुलता कळी ही खुलेना ...

ग्रेट इंडियन ड्रिम्स

Image
सुप्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या " what young india wants " या इंग्रजी पुस्तकातील एक लेख " ग्रेट इंडियन ड्रिम्स "  युनायटेड स्टेट मध्ये अशी एक संकल्पना आहे. " ग्रेट अमेरिकन ड्रिम्स " अमेरिकन लेखकांच्या अनुसार आणि इतिहास तज्ञांच्या नुसार ग्रेट अमेरिकन ड्रिम्स असे आहे की ' आयुष्य हे सगळ्यांसाठी आर्थिक दृष्ट्या व्यवस्थित आणि परिपूर्ण असावे. ज्यात प्रत्येकासाठी संधी ही त्याच्या क्षमतेनुसार आणि गुणवत्तेनुसार मिळायला हवी.' अमेरिकन ड्रिम्स सांगतात 'अतूट मेहनत, संशोधन आणि प्राविण्य हे प्रत्येकाकडे असते.' आपल्याकडे तसे ग्रेट इंडियन ड्रिम्स नाहीत आणि मला नाही वाटत आपण ते त्यांच्याकडून कॉपी पेस्ट करावेत. त्यामुळे आपल्यासाठी आता " ग्रेट इंडियन ड्रिम्स " ही संकल्पना उभी करण्याची गरज आहे. मला वाटते ग्रेट इंडियन ड्रिम्स असे असू शकतात ' ज्यात प्रत्येक नागरिकाने खूप मेहनत, शांतता आणि त्याच्या संशोधनात यशस्वी व्हावे. ज्याअर्थी तो आता ज्या ठिकाणी पोहोचला आहे. प्रत्येकाने स्वतःकडून एक नागरिक म्हणून समाजाला द्यावे. माझी जितकी पात्रता आहे त्...

ठिणगी

Image
काही दिवसांपूर्वी मी एक पुस्तक वाचायला आणले. लेखक “ चेतन भगत “ पुस्तकाचे नाव “ what young india wants “ या इंग्रजी पुस्तकात लेखकाच्या एकंदर जीवनात घडलेले अनुभव आणि त्यावर त्याने लिहिलेले काही अनुमान आहेत. यावर लिहिताना बऱ्याच ठिकाणी मला त्यातील काही अनुभव समोर पाहिले, घेतले आहे असे वाटले. कदाचित वाचताना तुम्हाला ही तसे वाटू शकते. साधारण अठरा ते पंचवीस या वयात असताना मला किंवा तुमच्यातील कित्येकांना ही माझी गोष्ट आहे असे वाटू शकते. त्यामुळे आजूबाजूला घडणाऱ्या या घटनांतून कसे तरून जावे याचे थोडक्यात उत्तर या प्रकरणात समजले. त्यातील हे एक प्रकरण ठिणगी...चेतन भगत यांच्या दृष्टीने ठिणगी हे लिहिलेले प्रकरण... “ I come from a land of billion spark, isn’t that cool “ मी ज्या जागेवरून आलो. तिथे असंख्य ठिणग्या आहेत. खरंच भारी आहे ना ! सगळ्यांना सुप्रभात आणि मला तुमच्यासोबत बोलायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. हा दिवस तुमचा आहे. हो... तुम्हीच... स्वतःचा (कम्फर्ट किंवा डिसकम्फर्ट ) परीघ सोडून काही तरी बनण्यासाठी या कॉलेजमध्ये तुम्ही आलेले आहात. माणसाच्या आयुष्यात असे काही दिवस येतात, जेव्हा त...

३. स्वप्ने

ख्वाहिश नहीं मुझे मशहूर होने की, आप मुझे पहचानते हो बस इतना ही काफी है। अच्छे ने अच्छा और बुरे ने बुरा जाना मुझे, जिसकी जितनी जरूरत थी उसने उतना ही पहचाना मुझे! जिन्दगी का फलसफा भी कितना अजीब है, शामें कटती नहीं और साल गुजरते चले जा रहे हैं! एक अजीब सी 'दौड़' है ये जिन्दगी, जीत जाओ तो कई  अपने पीछे छूट जाते हैं और हार जाओ तो अपने ही पीछे छोड़ जाते हैं! बैठ जाता हूँ मिट्टी पे अक्सर, मुझे अपनी औकात अच्छी लगती है। मूळ लेखन - मुंशी प्रेमचंद ( https://www.hindipool.com/munshi-premchand-poems-in-hindi/amp/ ) इच्छा नाही मला प्रसिद्ध होण्याची आता तुम्ही मला ओळखले इतके ही पुरेसे आहे... चांगल्यानी चांगले आणि वाईटानी वाईट समजले मला  जितकी ज्याची गरज होती त्याने तितके ओळखले मला  जगण्याचं शास्त्र इतके विचित्र आहे की  सूर्य मावळत नाही आणि वर्ष सरत जातात... जिंकलो तर आपले कोणीतरी मागे राहते आणि, अपयश आले तर आपलेच मागे टाकून जातात... मातीच्या जमिनीवर बसत असतो आजकाल मला माझी ऐपत प्रिय आहे... अनुवाद - जुईली अतितकर