Posts

Showing posts from June, 2022

ठिणगी

Image
काही दिवसांपूर्वी मी एक पुस्तक वाचायला आणले. लेखक “ चेतन भगत “ पुस्तकाचे नाव “ what young india wants “ या इंग्रजी पुस्तकात लेखकाच्या एकंदर जीवनात घडलेले अनुभव आणि त्यावर त्याने लिहिलेले काही अनुमान आहेत. यावर लिहिताना बऱ्याच ठिकाणी मला त्यातील काही अनुभव समोर पाहिले, घेतले आहे असे वाटले. कदाचित वाचताना तुम्हाला ही तसे वाटू शकते. साधारण अठरा ते पंचवीस या वयात असताना मला किंवा तुमच्यातील कित्येकांना ही माझी गोष्ट आहे असे वाटू शकते. त्यामुळे आजूबाजूला घडणाऱ्या या घटनांतून कसे तरून जावे याचे थोडक्यात उत्तर या प्रकरणात समजले. त्यातील हे एक प्रकरण ठिणगी...चेतन भगत यांच्या दृष्टीने ठिणगी हे लिहिलेले प्रकरण... “ I come from a land of billion spark, isn’t that cool “ मी ज्या जागेवरून आलो. तिथे असंख्य ठिणग्या आहेत. खरंच भारी आहे ना ! सगळ्यांना सुप्रभात आणि मला तुमच्यासोबत बोलायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. हा दिवस तुमचा आहे. हो... तुम्हीच... स्वतःचा (कम्फर्ट किंवा डिसकम्फर्ट ) परीघ सोडून काही तरी बनण्यासाठी या कॉलेजमध्ये तुम्ही आलेले आहात. माणसाच्या आयुष्यात असे काही दिवस येतात, जेव्हा त...