Posts

Showing posts from February, 2025

११. पर्वत म्हणतो अभिमानाने

पर्वत म्हणतो अभिमानाने तू पण उंच होऊन बघ सागर म्हणतो या लाटासम  खोल मनाचा तळ होऊन बघ समजून घे काय सांगतात वाहणाऱ्या या लहरींना भरून घे तू मनात आपल्या गोड मृदू आकांशाना पृथ्वी म्हणते धीर असू दे किती वाढला डोक्यावर भार आकाश म्हणते पसरावे तू  सामावून घे सारा संसार (कवी, सोहन लाल द्विवेदी लिखित पर्वत केहता शिश उठाकर या कवितेचा अनुवाद )

शिंपले

Image
काही दिवसांपूर्वी एक हिंदी कथा वाचण्यात आली. कथा अशी होती, एक सहा वर्षाचा मुलगा आपल्या चार वर्षाच्या बहिणीला घेऊन बाजारातून चालला होता. त्याला अचानक वाटले आपली बहीण मागे राहिली म्हणून त्याने मागे वळून पाहिले. त्याला दिसले,  ती एका दुकानाच्या बाहेर उभी राहून काचेच्या पलीकडे ठेवलेली खेळणी निरखून बघत होती. तो मुलगा धावत मागे आला आणि तिला विचारले " तूला काही हवे का यातले ? " तिच्या निरागस डोळ्यांनी एका ठिकाणी नजर रोखली आणि सुंदर बाहुलीकडे बोट दाखवले. आपल्या बहिणीचा हात पकडून तो तिला दुकानात घेऊन आला. त्याने ती बाहुली उचलून तिच्या हातात दिली. ती बाहुली हातात आल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तो मनोमन खुश झाला. दुकानदार गल्ल्यावर बसून हे सारे पाहत होता. तो मुलगा तिला घेऊन दुकानदाराजवळ आला. सहा वर्षाच्या त्या मुलाचे आपल्या बहिणीसाठी भरून आलेले काळीज बघून दुकानदाराला गहिवरून आले. मुलाने दुकानदाराला विचारले " या बाहुलीची किंमत काय आहे ? " त्यावर तो म्हणला " बाळा, तू सांग ... तू काय देऊ शकशील ? " तेव्हा त्या मुलाने खिशात हात घातला आणि खिशातून शिंपल...