ग्रेट इंडियन ड्रिम्स
सुप्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या " what young india wants " या इंग्रजी पुस्तकातील एक लेख " ग्रेट इंडियन ड्रिम्स " युनायटेड स्टेट मध्ये अशी एक संकल्पना आहे. " ग्रेट अमेरिकन ड्रिम्स " अमेरिकन लेखकांच्या अनुसार आणि इतिहास तज्ञांच्या नुसार ग्रेट अमेरिकन ड्रिम्स असे आहे की ' आयुष्य हे सगळ्यांसाठी आर्थिक दृष्ट्या व्यवस्थित आणि परिपूर्ण असावे. ज्यात प्रत्येकासाठी संधी ही त्याच्या क्षमतेनुसार आणि गुणवत्तेनुसार मिळायला हवी.' अमेरिकन ड्रिम्स सांगतात 'अतूट मेहनत, संशोधन आणि प्राविण्य हे प्रत्येकाकडे असते.' आपल्याकडे तसे ग्रेट इंडियन ड्रिम्स नाहीत आणि मला नाही वाटत आपण ते त्यांच्याकडून कॉपी पेस्ट करावेत. त्यामुळे आपल्यासाठी आता " ग्रेट इंडियन ड्रिम्स " ही संकल्पना उभी करण्याची गरज आहे. मला वाटते ग्रेट इंडियन ड्रिम्स असे असू शकतात ' ज्यात प्रत्येक नागरिकाने खूप मेहनत, शांतता आणि त्याच्या संशोधनात यशस्वी व्हावे. ज्याअर्थी तो आता ज्या ठिकाणी पोहोचला आहे. प्रत्येकाने स्वतःकडून एक नागरिक म्हणून समाजाला द्यावे. माझी जितकी पात्रता आहे त्...