ग्रेट इंडियन ड्रिम्स


सुप्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या " what young india wants " या इंग्रजी पुस्तकातील एक लेख " ग्रेट इंडियन ड्रिम्स " 

युनायटेड स्टेट मध्ये अशी एक संकल्पना आहे. " ग्रेट अमेरिकन ड्रिम्स " अमेरिकन लेखकांच्या अनुसार आणि इतिहास तज्ञांच्या नुसार ग्रेट अमेरिकन ड्रिम्स असे आहे की ' आयुष्य हे सगळ्यांसाठी आर्थिक दृष्ट्या व्यवस्थित आणि परिपूर्ण असावे. ज्यात प्रत्येकासाठी संधी ही त्याच्या क्षमतेनुसार आणि गुणवत्तेनुसार मिळायला हवी.'

अमेरिकन ड्रिम्स सांगतात 'अतूट मेहनत, संशोधन आणि प्राविण्य हे प्रत्येकाकडे असते.'

आपल्याकडे तसे ग्रेट इंडियन ड्रिम्स नाहीत आणि मला नाही वाटत आपण ते त्यांच्याकडून कॉपी पेस्ट करावेत. त्यामुळे आपल्यासाठी आता " ग्रेट इंडियन ड्रिम्स " ही संकल्पना उभी करण्याची गरज आहे. मला वाटते ग्रेट इंडियन ड्रिम्स असे असू शकतात ' ज्यात प्रत्येक नागरिकाने खूप मेहनत, शांतता आणि त्याच्या संशोधनात यशस्वी व्हावे. ज्याअर्थी तो आता ज्या ठिकाणी पोहोचला आहे. प्रत्येकाने स्वतःकडून एक नागरिक म्हणून समाजाला द्यावे. माझी जितकी पात्रता आहे त्यापेक्षा मी जास्त यशस्वी झालो पण मला असे वाटणार नाही की मी परिपूर्ण जगलो. जोपर्यंत मी काही परत देत नाही. तोपर्यंत मी " ग्रेट इंडियन ड्रिम्स " जगतोय " मला असे वाटणार नाही.

हे लिखाण माझ्यासाठी त्याचाच एक भाग आहे. जे मी माझ्या देशाला देऊ शकतो. मला माहिती आहे हा निबंध परिपूर्ण नाही. कधी कधी अगदीच सामान्य तर कधी आयडियल वाटेल. नकळतपणे काही गोष्टी त्यात राहून जातील. मी जे लिहितो त्या विषयात मी प्रवीण ही नसेन. मी फक्त लिहितोय आणि माझे मत देतोय पण मला असे वाटते की हे खूप महत्वाचे आहे. प्रत्येकाकडे यावर स्वतःचे उत्तर आणि मत असावे. आणि मला तुमच्याकडून काय हवे आहे ते तुम्हाला पुस्तक वाचल्यावर कळेल. त्यावर तुमच्या प्रतिक्रिया येतील. चर्चा होतील. जे प्रश्न मी इथे उचलून धरलेत तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या मताशी सहमत नसाल, पण इथे महत्वाचे आहे की तुम्ही त्या दृष्टीने विचार कराल. आपले मत मांडाल. आपल्याला प्रत्येकालाच आपल्या देशात निर्माण होणाऱ्या प्रश्नांसाठी कार्यरत व्हावे लागेल. ज्या अर्थी तिथे काही होतं नाही असे वाटते. आपल्याला राजकारणाला ही दुर्लक्षित करून चालणार नाही. गोष्टी बदलतात. त्यामुळे देश बदलतो. या गोष्टी आणखी लवकर बदलतील. जर तुम्हाला बदलता आले तर ते बदलतील. चला तर आपले योगदान देऊया. देशाला नव्या दिशेने घेऊन जाताना ज्या लोकांनी मागे पाहिले ते म्हणले असणार हा एक गोंधळ दिसतो आहे. पण तो तसाच राहू देऊ नका. तो तेव्हाचा काळ होता; जेव्हा लोक एकमेकांच्या बाजूला बसायचे पण गोष्टी सुधारण्यासाठी काहीच घडत नव्हते. 


भारताला एक चांगले राष्ट्र होण्यासाठी एखाद्या क्रांतिकारकाप्रमाणे जसे त्यांनी बलिदान दिले. आपण ही जोडुया. इथे फक्त हिंदूंचा भारत नाही, मुस्लिमांचा भारत नाही. पंजाबी भारत किंवा तामिळ भारत नाही. इथे उच्च वर्गातला भारत किंवा खालच्या वर्गातील भारत नाही. अथवा काँग्रेसचा भारत , बिजेपीचा भारत नाही. हा फक्त एक भारत देश आहे. जो आपल्या सगळ्यांसाठी सुयोग्य राहण्याची जागा करायचा आहे. आपल्याला आपला देश मानाने श्रीमंत आणि जगात एक चांगले ठिकाण म्हणून निर्माण करायचा आहे. जिथे चांगल्या विचारांचा समाज हवा आहे. आणि जो पर्यंत आपण त्याच पानावर आहोत. तोपर्यंत मला तुमच्याकडून आपल्या देशासाठी अपेक्षा असतील. 
माझे ग्रेट इंडियन ड्रिम्स घेऊन मला तुमच्यासोबत संवाद साधता आला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. मी अशी आशा करतो की आतापासून ती सगळी स्वप्न तुमची ही असतील. 

Comments

  1. खूप खूप सुंदर लिहिलंय....आपल्या देशाला चांगल्या विचारांच्या समाजाची गरज आहे.💯💯✌️✌️🔥🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ठिणगी

शिंपले

११. पर्वत म्हणतो अभिमानाने