११. पर्वत म्हणतो अभिमानाने
पर्वत म्हणतो अभिमानाने
तू पण उंच होऊन बघ
सागर म्हणतो या लाटासम
खोल मनाचा तळ होऊन बघ
समजून घे काय सांगतात
वाहणाऱ्या या लहरींना
भरून घे तू मनात आपल्या
गोड मृदू आकांशाना
पृथ्वी म्हणते धीर असू दे
किती वाढला डोक्यावर भार
आकाश म्हणते पसरावे तू
सामावून घे सारा संसार
(कवी, सोहन लाल द्विवेदी लिखित पर्वत केहता शिश उठाकर या कवितेचा अनुवाद )
Comments
Post a Comment