१२. जगाला बदलू नका



     खूप वर्षांपूर्वीची एक गोष्ट आहे.  एक राजा आपल्या राज्यावर यशस्वीपणे राज्य करत होता. एकदा तो आपल्याच राज्यातील काही अज्ञात ठिकाणी भेट देण्यासाठी गेला. जेव्हा तो राजा हा दौरा पूर्ण करून आपल्या राजवाड्यात परत आला. त्याने तक्रार करायला सुरवात केली. प्रवासामुळे त्याचे पाय खूप दुखत होते. कारण यावेळी पहिल्यांदा त्याने एवढा दूरचा प्रवास केला होता आणि प्रवासातला रस्ता ही तसाच खडतर आणि खडकाळ होता. 


     त्या प्रवासानंतर त्याने आपल्या राज्यातले कर्मचाऱ्यांना सगळे रस्ते कातडीने झाकायला सांगितले. अर्थात या गोष्टीसाठी त्याना खूप जास्त गायीच्या कातड्याचे आणि पैशाची गरज होती. 


      त्याच्याच राजवाड्यातील एका नोकराने शेवटी धाडस करून  त्याला सांगितले " एवढे विनाकारण कशाला पैसे खर्च करायचे, तुम्ही त्याच कातडीचा तुकडा काढून त्याने तुमचे पाय का नाही झाकत ?" 


     सुरवातीला राजाला आश्चर्य वाटले पण नंतर त्याने मोठ्या मनाने मान्य केले आणि स्वतः साठी बूट बनवले. 


     या ठिकाणी एक महत्वाचा संदेश असा आहे की जर तुम्हाला हे जग राहण्या योग्य आनंदी  करायचे असेल तर तुम्ही स्वतः ला  आणि तुमच्या भावनाना बदला, जगाला नाही. 


- जुईली अतितकर

Comments

Popular posts from this blog

ठिणगी

शिंपले

११. पर्वत म्हणतो अभिमानाने